
मुंबईच्या पवईसारख्या प्रतिष्ठित परिसरात उभ्या असलेल्या पवई प्लाझा शॉपिंग सेंटर मध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे. Trap News या पत्रकारिता संस्थेने स्थानिक दुकानदारांच्या तक्रारींनंतर केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याचे उघड झाले आहे.

स्थानिक त्रस्त दुकानदारांनी अनेक दिवसांपासून पवई प्लाझामधील स्पा सेंटरवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी Trap News च्या टीमशी संपर्क साधला आणि या संदर्भात तपास करण्याची विनंती केली. यानंतर, Trap News च्या पत्रकाराने ग्राहक बनून या स्पा सेंटरना भेट दिली. छुप्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने केलेल्या तपासणीदरम्यान एक धक्कादायक वास्तव समोर आले.
स्पा सेंटर की वेश्या व्यवसायाचे केंद्र?
पत्रकारांनी उघड केलेल्या तपशीलांनुसार, या स्पा सेंटरमध्ये ग्राहकांना महिलांचा “चॉइस” देण्यात येतो. पसंतीनुसार महिलांना मसाजसाठी नेण्यात येते आणि नंतर “एक्स्ट्रा सर्विसेस” नावाखाली वेश्या व्यवसायाची ऑफर दिली जाते.
विशेषतः ड्रीम्स सलून आणि स्पा, ९ हिल्स स्पा, अन्नदा थाई स्पा, रुद्रा फॅमिली salon अँड स्पा, वेललनेस स्पा, स्टेटस स्पा आणि अजून इतर नावे चालणाऱ्या स्पा केंद्रात स्टिंग ऑपरेशन करण्यात आला. ग्राहकांना हँडजॉब, बॉडी-टू-बॉडी मसाज आणि पूर्ण वेश्या व्यवसायासाठी पर्याय दिले जात असल्याचे पुरावे या स्टिंग ऑपरेशनमध्ये मिळाले.
महापालिकेचा हलगर्जीपणा आणि कायद्याचा भंग
स्पा सेंटरमध्ये लहान लहान अनधिकृत केबिन तयार करण्यात आले आहेत, जिथे हा अनैतिक व्यवसाय चालतो. महापालिकेच्या परवान्याच्या अटींचे सरळ उल्लंघन होत असूनही अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.






स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांचा संताप
या घटनांमुळे पवई प्लाझा परिसरातील रहिवाशांमध्ये आणि दुकानदारांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. त्यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यांची मागणी आहे की, मुंबई पोलिसांनी आणि महापालिकेने या स्पा सेंटरवर तातडीने छापे टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी.
Trap News च्या पत्रकारांचे धाडसी पाऊल
Trap News च्या पत्रकारांनी केलेले हे धाडसी स्टिंग ऑपरेशन गैरकृत्य उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. या प्रकारांवर वाचा फोडून त्यांनी समाजासमोर या व्यवसायाचे सत्य ठेवले आहे.
प्रशासनाची भूमिका : वेळेची मागणी
पवई प्लाझासारख्या उच्चभ्रू परिसरात असे प्रकार उघड होणे हे प्रशासनासाठी धोक्याचा इशारा आहे. मुंबई पोलिस आणि महापालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.


समाजाची भूमिका आणि प्रश्नचिन्ह
मुंबईतील अशा घटनांवर कधीच पूर्णविराम लागेल का? प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बेकायदेशीर व्यवसायांना बळ मिळत आहे का? समाजाने या गैरकृत्यांना विरोध करून कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पाठिंबा देणे गरजेचे आहे.
मुंबई शहराची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपण्यासाठी पवई प्लाझातील या प्रकरणावर तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. आता पाहायचे आहे, प्रशासन या गंभीर प्रकरणावर कशी आणि किती जलद कारवाई करते.
सदर प्रकरणी अपडेट बातमी लवकरच Trap News वर….