
Mumbai Crime News: मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत महिला किती असुरक्षित आहेत याच अनेकदा प्रत्यय आला आहे. अशातच 17 वर्षीय मुलीवर 24 वर्षीय महिलेने अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आलं.
Mumbai Crime News Marathi: देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी महिला आणि मुलांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालली आहे. याचदरम्यान दक्षिण मुंबईतील १७ वर्षीय मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २४ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली. या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तपासादरम्यान, पीडित मुलगी आणि आरोपी तरुणाचे फोन बंद असल्याचे आढळून आलं होतं. या दोघींचा तीन दिवस शोध घेतल्यानंतर दोघीही विरारमधील एका रिसॉर्टमध्ये आढळून आल्या. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेवर अत्याचाराचं
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित मुलगी दक्षिण मुंबईत तिच्या आजीसोबत राहते. तर पीडितेचे आई वडिल मुंबईच्या पूर्व उपनगरात राहतात. दरम्यान ७ जानेवारीला ती कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती. यानंतर मुलीने आईला मेसेज करून स्वत:हून घर सोडलं आहे,तिची काळजी करू नये, असा मेसेज केला. हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तिचा काही थांगपत्ता लागला नाही. काही वेळाने तिचा फोन बंद लागला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
शिरोलीत चोरीच्या घटना थांबता थांबेना; पंचगंगा नदीवरील केबल चोरट्यांनी नेली चोरून
यावेळी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी संशयित महिलेचे कॉल डिटेल्सही मिळाले. संबंधित महिला काही दिवसांपूर्वी विरारमधील एका हॉटेलमध्ये फोन केला होता. या आधारे पोलिस विरारमधील संबंधित हॉटेलमध्ये पोहोचलेपण त्या मुली तिथे नव्हता. याबाबत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, दोन मुली हॉटेलमध्ये आल्या होत्या, परंतु त्यांना रुम देण्यात आली नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघींचा माग घेतला.
दरम्यान, आरोपी महिलेने नवीन सिम कार्ड खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी परिसरातील सिम कार्ड विक्रेत्यांची चौकशी केली आणि त्यांना आरोपी महिलेचा फोन नंबर सापडला. या नंबरचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आणि पोलिस विरारमधील एका रिसॉर्टमध्ये पोहोचले. तेव्हा आरोपी तरुणी आणि पीडित मुलगी तिथे आढळून आली. दोघींनी रिसॉर्ट मध्ये राहण्यासाठी आपण बहिणी असल्याचं सांगितलं होतं. तसेच एका परीक्षेसाठी विरारला आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
चौकशीदरम्यान अशी माहिती मिळाली की, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. पण पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सोच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. म्हणून त्याची रवानगी पोलिस ठाण्यात आली. नंतर तिला भायखळा येथील महिला तुरुंगात पाठवण्यात आलं. दुसरीकडे, पोलिसांनी पीडित मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याता प्रयत्न केला.पण मुलीने घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बालसुधार गृहात पाठवण्यात आले. आरोपी तरुणीच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. एक वर्षापूर्वी आरोपी मुली आणि पीडित मुलीचीच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल संशय आला होता. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलीला दुसऱ्या जिल्ह्यातील नातेवाईकांकडे पाठवले. एक वर्षानंतर मुलगी मुंबईत परतली होती. यानंतर पुन्हा दोघींमध्ये जवळीक वाढली होती.