
संरक्षण क्षेत्रातील वेबसाईट IDRW ने रशियन अधिकऱ्यांशी हवाल्याने ही माहिती दिली आहे. रशियाच्या प्रस्तावानुसार Su-57E ची निर्मिती भारत नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या प्रकल्पात करणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या खात्यात पाचव्या पिढीतील लढाऊ विमान येण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या लढाऊ विमानासाठी भारताकडे सध्या दोन ऑफर आहेत. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या स्टील्थ फाइटर F-35 ऑफरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यानंतर आता रशियाकडूनही भारताला जोरदार ऑफर मिळाली आहे. रशिया त्यांचे सुखोई-57 (एसयू-57) भारताला देण्यास तयार झाली आहे. भारतासाठी रशियाची ऑफर नाकारणे अवघड होणार आहे. कारण अमेरिकेच्या ऑफरपेक्षा ही ऑफर अधिक चांगली आहे. त्यामुळे भारत अमेरिकेकडून आलेली एफ-35 ची ऑफर सोडण्याची शक्यता आहे.
रशिया देणार भारताला तंत्रज्ञान
बेंगळुरुमध्ये एयरो इंडिया 2025 प्रदर्शन झाले. त्यात रशियाने Su-57E लढाऊ विमानांची निर्मिती भारतात करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे रशिया पाचव्या पिढीतील या विमानाचे तंत्रज्ञानसुद्धा भारताला देण्यास तयार आहे. रशियाची सरकारी संरक्षण निर्यात एजन्सी रोसोबोरॉन एक्सपोर्ट आणि युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्या या प्रस्तावात तंत्रज्ञानाच्या संपूर्ण हस्तांतरणासोबतच भारताला आपल्या देशांतर्गत प्रणालीनुसार बदल करता येणार आहेत.
नाशिकमध्ये होणार निर्मिती
संरक्षण क्षेत्रातील वेबसाईट IDRW ने रशियन अधिकऱ्यांशी हवाल्याने ही माहिती दिली आहे. रशियाच्या प्रस्तावानुसार Su-57E ची निर्मिती भारत नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या प्रकल्पात करणार आहे. याठिकाणी सुखोई-30MKI चे उत्पादन केले जात आहे. रशियाचा हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा भारत आपल्या स्वदेशी एडवान्स मीडियम लढावू विमानाच्या प्रकल्पावर काम करत आहे. रशियन अधिकाऱ्याने IDRW ला सांगितले की तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणामुळे भारताला विमानात स्वदेशी प्रणाली आणि उप-प्रणाली जोडता येणार आहे.
भारतीचे पाचव्या पिढीतील विमान आता प्राथमिक पातळीवर आहे. त्याचे उत्पादन 2034-35 मध्ये होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सुखोई 57E च्या ऑफरमध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेतील पोकळी भरून काढण्याची क्षमता आहे. रशिया तंत्रज्ञान देखील देत आहे. तसेच एएमसीए विकास कार्यक्रमात देखील मदत करू शकते